महाराष्ट्रात चाललंय काय? पुण्यानंतर... या जिल्ह्यात 24 तासात अत्याचाराच्या दोन भयाण घटना

महाराष्ट्रात चाललंय काय? पुण्यानंतर... या जिल्ह्यात 24 तासात अत्याचाराच्या दोन भयाण घटना

प्रतिनिधी - वाशिम

पुण्यातील स्वारगेट अत्याचार घटनेने अवघ्या महाराष्ट्राला धक्का बसला असताना.! पुण्यानंतर आता वाशिम जिल्ह्यात महिला - मुलीवरील अत्याचाराच्या आणखी दोन घटना समोर आल्या आहेत.  वाशिम शहरात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्काराची एक घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत दुसरी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. तर गेल्या 24 तासात लैंगिक अत्याचाराच्या दोन वेगवेगळ्या घटना जिल्हात घडल्याने एकच खळबळ उडालीय.

वाशिम येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्यामाहितीनुसार; पीडित मुलगी कॉम्प्युटर क्लासमधून घरी परतत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिला गाठले. त्याने, “मी तुझ्या वडिलांचा मावसभाऊ आहे आणि तुझे मामा मला ओळखतात. माझ्या घरी चल, माझी मुलगी तुला भेटायला उत्सुक आहे,” असे सांगून तिला फसवले.  त्यानंतर त्याने तिला ऑटोरिक्षात बसवून एका निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने तिला चाकूचा धाक दाखवत, “शारीरिक संबंध ठेवू दे, नाहीतर मी तुझा गळा चिरून तुला विहिरीत फेकून देईन,” अशी धमकी दिली आणि तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धक्कादायक बाब म्हणजे  वाशिम शहरात एका सहा वर्षीय बालिकेवर बलात्काराची एक घटना घडल्यानंतर 24 तासाच्या आत दुसरी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.