साक्री पोलिसांची दमदार कामगिरी; चोरीच्या गुन्हातील आरोपी मुददेमालासह केले जेरबंद...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - खंडेराव पवार, धुळे
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरात दि. २७-०७-२०२३ रोजी; साक्री पोलीस स्टेशन येथे गिता केशव जगताप रा. रामजीनगर येथील यांनी फिर्याद दिली होती. दि. २७ रोजी रोजी पहाटे ०३.०० वा. च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरातून कोणीतरी अज्ञात इसमाने २६,००० रुपयाचे सोने व १,५०,००० रुपये रोख रक्कम असा एकूण १,७६,०० रु. चा मुद्देमाल चोरुन नेला. साक्री पोलीस स्टेशन येथे गुरन २६४ / २०२३ भादवि कलम ३८० प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन, सदर गुन्ह्याची तपास लोकेशन घेतले असता; त्यात (१). रुपेश रविंद्र पवार वय २६ रा. साक्री, (२) पवन प्रकाश जाधव वय २१ रा. साक्री, (३) सुल्तान नोरा शहा वय २३ रा. साक्री, (४) शशिकांत त्र्यंबक साळंखे वय २९ रा. शेवाळी (दातरती), (५) विक्की गुलचंद भवरे वय ३० रा. गढीभिलाटी साक्री, (६) उमेश दिपक बाबर रा. रामजीनगर साक्री हे आरोपी निष्पन्न झाल्याने, त्यांच्याकडून खालील प्रमाणे मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.
१६,०००/ रु. ७.६ ग्रॅम वजनाचे सोने. २४,००० /- रु रोख रक्कम . ५०० / १०० व ५० रु च्या चलनी नोटा. एकुण : - ४०,०००/- रुपये चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामिण विभाग साक्री साजन सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, रोशन निकम, प्रसाद रौंदळ, चेतन गोसावी, तुषार जाधव, मयुर चौधरी, संजय पाटील LCB धुळे, बापू रायते, संजय शिरसाठ, शांतीलाल पाटील यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास प्रसाद रौंदळ हे करीत आहेत.