BIG BREAKING : खराबवाडी गावातील महादेव मंदिरात चोरी...!

BIG BREAKING : खराबवाडी गावातील महादेव मंदिरात चोरी...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : खराबवाडी गावातील टेकडीवर असणाऱ्या महादेव मंदिरात मध्यरात्री चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मंदिराची दान पेटी, कार्यक्रमाला स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गैस सिलेंडर, साउंड अम्पलीफायर अशा वस्तू चोरट्याणी लंपास केल्या आहेत. त्यात मंदिराची दान पेटी कटरणे कट करून त्यातील पैसेही चोरट्यानी लंपास केले आहेत.

सध्या चाकण औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येतं आहे. मागील काही दिवसात औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यामध्ये मोठ्या मोठ्या चोऱ्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता चोरट्यानी धार्मिक मंदिरे यांच्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. महाळुंगे MIDC पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी घडलेल्या घटनेचा पंचनामा करून चोरांना शोधण्याची मोहीम सुरु केली आहे.