BIG BREAKING : खराबवाडी गावातील एका कंपनीच्या प्लांट हेडकडून महिलेचा विनयभंग..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील एका कंपनीच्या प्लांट हेड करून कंपनीतील ३३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, कंपनीचा प्लांट हेड अमोल नंदाराम तांबे(वय-३४ वर्षे), रा. काठापूर, ता. शिरूर, जि -पुणे याने १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास कंपनीत काम करत असलेल्या ३३ वर्षीय महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन तिला त्याच्या केबिनमध्ये बोलावून तू मला खूप आवडतेस, आपण दोघे कोठे तरी फिरायला जाऊ असे म्हणून पीडित महिलेचा हात पकडून त्याच्या जवळ ओढून, फिर्यादी महिलेच्या कमरेला चिमटा घेऊन नकोसा स्पर्श केला. एका जबाबदार व्यक्तीने असे स्त्री लंपट चाळे केल्याने महिलेने धाडसाने पुढे येऊन या आंबट प्लांट हेडवरती महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या लंपट प्लांट हेड यावरच थांबला नाही तर,त्याने पीडित महिलेला घडलेला प्रकार कुणाला सांगितला तर तुला मी जिवंत ठेवणार नाही असे म्हणून जीवे मारण्याची धमकीही दिली. हा आंबट शौकीन प्लांट हेड अमोल तांबे याने यापूर्वीही व्हाट्सअँपवर पीडित महिलेला आपण पब मध्ये जायचे का? तू ड्रिंक वगैरे घेते की नाही. तुझे ड्रेसिंग खूप छान आहे असे मसेज पाठवून प्रेमसंबंध जवळीकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या स्त्री लंपट प्लांट हेडणे फिर्यादीच्या सहकारी महिला यांच्या सोबत सुद्धा छेड छाड केली असल्याचेहि समोर आले आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाळुंगे MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या लंपट प्लांट हेडला अटक केली आहे. कोणत्याही कंपन्यामध्ये वरिष्ठ असे महिलांच्या बरोबर चुकीचे वर्तन करत असतील तर त्यांच्या बद्दल निसंकोच तक्रार द्यायला हवी असेही काही जानकार बोलून दाखवत आहे. या लंपट प्लांट हेडवर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७५, ७८, ३५१(३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदार करत आहेत.