किनगाव हदित पिस्टल व तीन जिवंत काडतुसासह एका इसमास अटक

किनगाव हदित पिस्टल व तीन जिवंत काडतुसासह एका इसमास अटक

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील एका पिस्टल व तीन जीवत काडतूसासह अटक करण्याची घटना आज दिनांक ६. ११.२०२४,बुधवार रोजी घडली आहे. याबाबत किनगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पोलीस स्टेशन किनगाव चे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशनला हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, पोलीस स्टेशन किनगाव हद्दीमध्ये देवकरा परिसरात एक गिरी नावाचा इसम बेकायदेशीर गावठी कट्टा (पिस्टल) घेऊन फिरत आहे.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टाफ व दोन शासकीय पंच यांच्यासह देवकरा पाटी ते आनंदवाडी पाटी दरम्यान अहमदपूर ते अंबाजोगाई राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅप लावून थांबून, गोपनीय मिळालेल्या माहिती प्रमाणे नमूद वर्णनाचा इसम आल्याबरोबर त्यास मोटार सायकलसह रोडवर अडवून, त्यास नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश अशोक गिरी, वय 40 वर्षे, राहणार किनगाव असे सांगितले व त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा (पिस्टल) व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

महेश गिरी याच्याकडे कोणत्याही प्रकारचे अग्नि शास्त्र वापरण्याचा परवाना नसल्याने त्याच्याकडे मिळालेली पिस्टल व जिवंत काडतुसे असे पोलिसांनी मोटार सायकल सह सविस्तर जप्ती पंचनामा करून जप्त केली व त्यानंतर पोलीस स्टेशन किनगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी महेश अशोक गिरी यांच्या विरुद्ध भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि गजानन तोटेवाड हे करीत आहेत.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अप्पर पोलिस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी  मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काटापल्ले, पोलिस अमलदार मल्लिकार्जुन पलमटे, शिवाजी तोपरपे, अनिल इस्ताळकर, सुनील श्रीरामे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.