ड्रग्सचे इंजेक्शन देऊन दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार.! मुख्य सूत्रधार फरार...

ड्रग्सचे इंजेक्शन देऊन दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार.! मुख्य सूत्रधार फरार...

NEWS15 मराठी रिपोर्ट - खेड (पुणे)

राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचारच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून, विशेत: मागील काही महिन्यात पुणे जिल्ह्यात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा: एकदा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातून समोर आली आहे.

खेड पोलीस स्टेशन अंतर्गत ओळखीचा फायदा घेऊन, 2 अल्पवयीन मुलींना विश्वासात घेत त्यांना 3 युवकांनी ड्रगचे इंजेक्शन देऊन, त्यांना लॉजवर नेऊन बिअर आणि दारू पाजत रात्रभर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी 3 आरोपींविरोधात खेड पोलीसांनी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. परंतु, या घटनेतील मुख्य सुत्रधार फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

फरार असलेला प्रमुख आरोपी हा ड्रग पुरवणारा सुत्रधार असल्याची माहिती देण्यात आलीय. तर त्याच्याकडून आत्तापर्यंत किती जणांना ड्रग पुरवले? याबाबतीत पोलिस माहिती घेत आहेत. मंगळवारी (दि १४ मे) रात्री हा प्रकार घडला आहे. बुधवारी सकाळी नशेत सदर पीडित तरुणी झिंगून घरी परत आल्या असता; पालकांच्या लक्षात ही बाब आल्याने आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीसांनी पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. यातील एक आरोपी युवक अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे.