अवैध शस्त्र बाळगणे पडले महागात; चाकणमध्ये १९ वर्षीय युवकावर गुन्हा

अवैध शस्त्र बाळगणे पडले महागात; चाकणमध्ये १९ वर्षीय युवकावर गुन्हा

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,

चाकण : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम सुरू असतानाच चाकण उत्तर पोलिसांनी १९ वर्षीय युवकाला धारदार तलवारीसह ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस स्टेशन चाकण उत्तर हद्दीत तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यात आली. यावेळी आकाश नवनाथ लोखंडे (वय १९, रा. चिंचोशी) हा युवक धारदार तलवारीसह आढळून आला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेत तलवार जप्त केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.

अवैध शस्त्रांवर पोलिसांचा वॉच

चाकण परिसरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा मोर्चा वळवला आहे. युवकाकडे धारदार तलवार नेमकी कोणत्या उद्देशाने होती, याबाबत पुढील तपासातून माहिती समोर येणार आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त मारुती जगताप, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश रांजणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रशांत आरदवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोरखांडे, पोलीस अमलदार शिंदे, कोळेकर, ढमढेरे, लोखंडे, कोळी, जगजाफ आणि सांडभोर यांनी कारवाईत सहभाग घेतला.