50 हजारांची लाच… प्रांत अधिकारी रंगेहात - आंबेगाव महसूल विभागात ACBचा सर्जिकल स्ट्राइक...

50 हजारांची लाच… प्रांत अधिकारी रंगेहात - आंबेगाव महसूल विभागात ACBचा सर्जिकल स्ट्राइक...

प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड - आंबेगावं

 आंबेगाव तालुक्यात आज भ्रष्टाचारावर मोठा घाव घालत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धडक कारवाई केली.

प्रांत अधिकारी गोविंद शिंदे आणि त्यांचा सहकारी कर्मचारी खेनार यांना ₹50,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, त्यामुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका सरकारी कामाचा निकाल लावण्यासाठी तक्रारदाराकडून थेट लाचेची मागणी करण्यात आली होती.

संतप्त तक्रारदाराने वेळ न दवडता ACBकडे तक्रार दाखल केली… आणि इथूनच सुरू झाला सापळ्याचा खेळ 

ACBच्या पथकाने खात्री करून प्रांत कार्यालयात ट्रॅप रचला. ठरल्याप्रमाणे ₹50,000 ची रक्कम स्वीकारताना  प्रांत अधिकारी शिंदे - कर्मचारी खेनार दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले!

 कारवाईचे ठळक मुद्दे

 अटक: गोविंद शिंदे (प्रांत अधिकारी), खेनार (कर्मचारी)

लाच: ₹50,000

ठिकाण: प्रांत कार्यालय, आंबेगाव

दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईनंतर सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघड्यावर आला आहे.

सामान्य नागरिकांकडून लाच घेणारे अधिकारी अजून किती? ACBच्या या कारवाईने मात्र स्पष्ट संदेश दिला आहे. लाच घेणाऱ्यांची आता खैर नाही!