BIG BREAKING : बाबो...!महाळुंगे गावात प्रेम प्रकरणातून महिलेवर अँसिड हल्ला..

BIG BREAKING : बाबो...!महाळुंगे गावात प्रेम प्रकरणातून महिलेवर अँसिड हल्ला..

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : महाळुंगे गावात कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय प्रेमीयुगलाने त्याच्या ३५ वर्षीय प्रेयसीवर अँसिड हल्ला केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील ३० वर्षीय प्रेमी आणि त्याची ३५ वर्षीय प्रियेशी हे मागील पाच वर्षांपासून एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते. त्यात दोघेही एकाच कंपनीत काम करत असल्याने त्यांचे प्रेम अजूनच दृढ झाले होते. प्रेम आले की त्यात वादविवाद आलेच. यांचेही तसेच वादविवाद सुरु झाले. पण म्हणतात ना मनभरले की, शास्रानुसार एकमेकांचा तिरस्कार वाटू लागतो. अगदी काहि अंशी यांच्यातही तसेच घडत असावे. पण यांचे भांडण इतके टोकाला गेले की, अखंड प्रेमात बुडालेला प्रेमी याने ती माझी नाही तर कुणाचीच नाही असा निश्चयी विचार करून त्याने मागचा पुढचा विचार न करता थेट जिवाच्या पाखरावर अँसिड हल्ला चढवला.. प्रेयसीचे नशिब बलवत्तर म्हणून तिचा जीव वाचला. तिला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी तात्काळ यशवंतराव चव्हाण रुग्णालय, पिंपरी येथे हलविण्यात आले. 

महाळुंगे MIDC पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रेमी आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे. जखमी झालेल्या प्रियसीचे जाब जबाब घेऊन प्रेमीयुगलावर विविध कलमानव्हे महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आजच एका ४ वर्षीय चिमुकलीवर रक्ताच्या नात्यातील मामानेच अत्याचार केला. त्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच प्रेमीयुगलाने आपल्या प्रेयसीवर अँसिड हल्ला केला. त्यामुळे कुठे तरी महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अशा घटनावर कठोर असे पावले उचलण्यासाठी स्थानिक नागरिकाकडून मागणी केली जात आहे.

या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत.