गड्डा यात्रा हत्येतील चार'ही आरोपी पोलीसांच्या ताब्यात...
NEWS15 प्रतिनिधी : प्रवीण मखरे
सोलापूर : सिध्देश्वर गड्डा यात्रेच्या ठिकाणी झालेल्या खूनातील 4 ही आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून, फौजदार चावडी पोलीसांच्या ताब्यात केले आहे. गुरुवारी दुपारी गड्डा यात्रेच्या ठिकाणी आर्थिक व्यवहारातून अतिक साह अख्तर साह वय २१ या तरुणाचा धारधार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याने, खळबळ उडाली होती. या हल्यात अन्य दोन जण जखमी झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच; पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त दिपाली काळे, गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने या घटनेचा तपास गुन्हे शाखा व फौजदार चावडी पोलीस यांच्याकडे दिला. दोन्ही पथकाकडून तपासाचे चक्र फिरवण्यात असता; सिध्देश्वर यात्रा काळात फिरत्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यातील विक्रेते कुठून आले याची फार माहिती नसतानाही पोलीसांनी तपासाची चक्रे योग्य दिशेने फिरवून, रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅन्ड यासह राष्ट्रीय महामार्गावरून जाणारी वाहनांवर लक्ष केंद्रित केले. घटना घडल्यानंतर आरोपींनी मोबाईल बंद करून ठेवल्याने, तपासाला अडचण येत असतानाही पोलीस कुंभारी, अक्कलकोट मार्गावरून आरोपी जात असल्याची माहिती बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि कृष्णात कोळी, महेश शिंदे, कुमार शेळके, राजू मुदगल, वसीम शेख, चालक नेताजी गुंड यांनी मोठ्या शिताफीने चार आरोपींना जेरबंद केले.
कुंभारीवरून गुलबर्गेच्या मार्गाने कर्नाटकात जाण्याच्या प्रयत्न त्यांचा होता. पोलिसांनी या खून प्रकरणी नौशाद अहमद कादरी वय २५ (हल्ला करणारा) टिटवाळा, दिलशाद शमशाद खान वय २४ कल्याण, अरविंद कृष्णासिंह वय ४४आंबेडकर नगर मुंबई व इब्रार इस्तीकार खान वय २५ या आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता; पैशाच्या देवाणघेवाणातून हा प्रकार घडल्याची कबुली आरोपींनी दिली. बिहारमधील या युवकांवरील खूनप्रकरणी तातडीने कारवाई केल्याने, राज्य सोडण्याअगोदर आरोपी सापडल्याने, याचं श्रेय सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकाला स्थानिक देत आहेत.