अहमदपुर तालुक्यातील मोळवण येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या...

अहमदपुर तालुक्यातील मोळवण येथे युवा शेतकऱ्याची आत्महत्या...

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : अहमदपुर तालुक्यातील किनगाव पासून जवळच असलेल्या मोळवणवाडी येथील युवक शेतकऱ्याने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोळवणवाडी येथील शेतकरी परमेश्वर एकनाथ मुसळे वय ३२ वर्षे यांना शेती अडीच एकर होती. त्याच्यावर उदरनिर्वाह भागत नसल्याने, शेतातील मोटार दुरूस्ती चे काम करत होता.  त्यांने महाराष्ट्र ग्रामीण बँके शाखा पिपळदरी जि. परभणी या बॅकेकडून कर्ज मोटार मेकानिक व्यवसायाकरीता घेतले होते. छोटा व्यावसाय आणि कमी शेती यामुळे तो अडचणीत आला होता. यातच त्याने झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

त्याला आई वडील तिन भाऊ तिन बहीनी एक मुलगी स्नेहा, परमेश्वर मुसळे वय ५ वर्षे व एक मुलगा महेश्वर परमेश्वर मुसळे वय २ वर्षे आणि पत्नी असा परिवार आहे.