शिवनखेड शिवारात गोवंश कत्तल; 6 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल...
प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपूर पोलीस स्टेशनमध्ये गोवंश तस्करी आणि कत्तली प्रकरणी 6 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 20 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास अहमदपूर तालुक्यातील शिवनखेड शिवारात पाशासाब करीमसाब शेख यांच्या जनावरांच्या गोठ्यासमोर घडली.
याविषयी पोलीसांकडून मिळालेली माहीती अशी की, पोलीस हवालदार ज्ञानोबा पंडलिक येमले (बक्कल नं. 1252) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून अंदाजे दोन ते तीन वर्षे वयाच्या एका गोवंशाची (कालवडीची) कत्तल केली. आरोपींनी त्याचे मुंडके, पाय, छाती आणि पोटाचे तुकडे केले. पोलिसांची चाहूल लागताच, आरोपीं पैकी 5 जण आणि इतर चार ते पाच अनोळखी व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. मात्र, अकरमखा मोहदिनखा पठाण (वय 60) हा कत्तल केलेल्या गोवंशाच्या शिल्लक मांसासह घटनास्थळी सापडला.
या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अंदाजे 1 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये कत्तल केलेल्या गोवंशाचे 30 किलो मांस, दोन धारदार सत्तूर, चार सुऱ्या, एक दोरी, आणि तीन मोटरसायकल (बजाज सीटी 100, होंडा शाइन, होंडा शाइन) यांचा समावेश आहे.
आरोपी अकरमखा मोहदिनखा पठाण (वय 60, रा. शिवनखेड, ता. अहमदपूर) कलीम आलीम बेग (रा. शिवनखेड, ता. अहमदपूर) शादुल बशिर डांगे (रा. शिवनखेड, ता. अहमदपूर बबलु उसमानसाब शेख (रा. शिवनखेड, ता. अहमदपूर) जमिर सयद मंगरुळरकर (रा. मंगरुळ, ता. जळकोट) खलील मुसा शेख (रा. वाढवणा (बु), ता. अहमदपूर) याव्यतिरिक्त, चार ते पाच अनोळखी इसम यात सामील असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या सर्वांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 1995) कलम 5, 5 (अ), 5 (क), 9 (ब) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 3 (5) नुसार दाखल करण्यात आला असुन पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.