क्राईम : महाळुंगे MIDC पोलिसांची दमदार कारवाई, मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..!
![क्राईम : महाळुंगे MIDC पोलिसांची दमदार कारवाई, मोटारसायकली चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..!](https://news15marathi.com/uploads/images/202412/image_750x_675f07826cf1e.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : महाळुंगे MIDC पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून एकूण चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७ मोटारसायकली व मोटारसायकलीचे सुट्टे भाग असा मिळून एकूण ३ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून दमदार कामगिरी बजावली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या सुचनेनुसार महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटार सायकली चोरीवर आळा घालविण्यासाठी गुन्ह्याचे क्राईम मैपिंग करण्यासाठी नाकाबंदी,पेट्रोलिंग करून तसेच मोटार सायकल चोरीच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून गुन्हेगारांचा शोध घेऊन मोटार वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या उकल करण्याच्या वरीष्ठाच्या सुचनेनुसार त्यानुसार महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी पेट्रोलिंग करून घटना घडलेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. परिसरातील सीसीटीव्ही तपासात असताना एक सारख्या वर्णाचे तीन व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकल चोरताना पोलिसांना दिसून आले. याच चोरांची अधिक माहिती पोलिसांनी घेतली असता सदरचे इसम मंचर ता.आंबेगाव येथील असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस शिपाई मंगेश कदम यांना मिळाली.
पोलीस शिपाई मंगेश कदम यांच्या माहितीच्या आधारे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण धाडगे यांच्यासह अंमलदार यांनी तात्काळ खानवस्ती, मंचर, ता.आंबेगाव जि.पुणे येथून सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आलेलेल्या इसमांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तसेच जवळपासच्या परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून एकूण ७ मोटार सायकली चोरी केल्या असल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याकडून चोरी केलेल्या एकूण ७ दुचाकी व ३ दुचाकी चेसी,इंजिन,मैकव्हील असे सुट्टे भाग हस्तगत करून त्यांच्याकडून एकूण ३ लाख १० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलें आहे.
या गुन्ह्यातील आरोपींवर विविध पोलीस ठाण्यातही असेच चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी १.अतुल उर्फ मन्या संदीप गावडे(वय-१९ वर्षे),रा.खाणवस्ती, मंचर ता.आंबेगाव, जि.पुणे, आरोपी २.गणेश मच्छिंद्र भगत(वय-१८ वर्षे), रा.खाणवस्ती, मंचर ता.आंबेगाव, जि.पुणे, आरोपी ३.अजित कैलास जाधव(वय-२३ वर्षे),रा.ठाकरवाडी जऊळके खुर्द, ता.खेड, जि.पुणे(मोटारसायकलचे सुट्टे भाग विकत घेणारा),या तीन आरोपींच्या बरोबर एक विधीसंघर्षित अल्पवयीन आरोपीलाही महाळुंगे MIDC पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हे मैकव्हील असलेल्या स्प्लेनडर मोटारसायकल चोरी करून त्या आंबेगाव व खेड तालुक्यातील सिमावर्ती भागातील जंगलात नेऊन त्या खोलून त्याचे मैकव्हील व सुट्टे भाग वेगळे करून विक्री करून उर्वरित मोटारसायकलींचा सांगाडा निर्जन ठिकाणी अथवा विहिरीत फेकून देऊन नष्ट करत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.
सदर कारवाई महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते, पोलीस निरीक्षक(गुन्हे) प्रविण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस हवालदार अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर,युवराज बिराजदार, किशोर सांगळे, पोलीस नाईक संतोष काळे, पोलीस शिपाई शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, मंगेश कदम, अमोल माटे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ -३ कार्यालय येथील पोलीस हवालदार राजू जाधव यांनी केली.