धक्कादायक.! धारदार हत्याराने महिलेच्या डोक्यात वार करून हत्या...
![धक्कादायक.! धारदार हत्याराने महिलेच्या डोक्यात वार करून हत्या...](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_6683e24ba2bec.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपुर तालुक्यातील विळेगाव येथे धारदार हत्याराने महिलेच्या डोक्यात वार करून, खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर महिलेचा मृतदेह शेतात आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार; विळेगाव येथे दि. १ जुलै रोजी सांयकाळी ५ ते ६ च्या दरम्यान ही घटना घडीला असून, आकाश उर्फ नागार्जुन कचरू ढगे यांच्या फिर्यादीवरून किनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी व त्याची आई मयत तारामती कचरू ढगे वय - ४५ वर्षे रा. विळेगाव या महिले विषयी मनामध्ये राग धरून, आरोपी क्र. २ साइनाथ पंढरी तेलगे याच्या सांगण्यावरून आरोपी क्र. १ बाबु हाक्कानी शेख याने.! फिर्यादीच्या आईला कोणत्यातरी टोकदार व धारदार हत्याराने उजव्या कानाजवळ, डाव्या बाजूला कपाळावर आया डोक्यावर वार करून हत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून आरोपी क्र. १ बाबु हाक्कानी शेख व आरोपी क्र. २ साइनाथ पंढरी तेलगे दोघे रा. विळेगाव ता. अहमदपूर जि. लातूर यांच्यावर किनगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास भाऊसाहेब खंदारे करीत आहेत.