जेवण न दिल्याने, विचित्र पद्धतीने पतीने केली पत्नीची हत्या.! आरोपी पतीला अटक...

जेवण न दिल्याने, विचित्र पद्धतीने पतीने केली पत्नीची हत्या.! आरोपी पतीला अटक...

NEWS15 मराठी रिपोर्ट - आशिष ढगे पाटील

पुणे हे शहर विद्येचे आणि संस्कृतीचे माहेर घर मानले जाते.! परंतु, ह्याच पुण्याची आता नवीन ओळख निर्माण होत असून, यामुळे येथील वातावरण भयभीत स्वरूपाचे झाले आहे. मागील काही महिन्यात अनेक मोठं मोठ्या आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना ह्या शहरात घडल्या आहेत. 

हत्या, बलात्कार, दरोडा, लूटमार, किडण्यापिंग यासह इतर अनेक घटना दिवसेंदिवस पुणे जिल्हा आणि शहरात घडत आहेत. तर अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, पतीने आपल्या पत्नीचा विचित्र पद्धती खून केला आहे. तर ह्या मागील कारण देखील एकदम शुल्लक आहे. विशेष म्हणजे आरोपी पतीने ही हत्या करताना कोणतेही शस्त्र न वापरता पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केला आहे. जेवण न दिल्यामुळे पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तर या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी पतीला अटक केली आहे. कात्रज भागात हा सगळा विचित्र प्रकार घडला आहे.

जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीच्या छातीत बुक्क्या मारून तिची हत्या केली आहे. हा सगळा प्रकार घडला तेव्हा आरोपी पतीने मद्यपान केले होते. क्षुल्लक कारणावरुन राग अनावर झाल्याने माथेफिरूने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेमुळे कात्रज परिसरात खळबळ उडाली आहे. माधुरी कांबळे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर तानाजी कांबळे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तानाजी कांबळेवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माधुरीचा मुलगा पियुष कांबळे याने पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी तानाजी कांबेळ याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजी कांबळे हा व्यवसायाने पेंटर असून रोजंदारीवर काम करत होता. तानाजी कांबळे दररोज घरी येताना मद्यपान करून येत असे. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तानाजी नेहमीप्रमाणे मद्यपान करून घरी आला होता. यावेळी त्याने त्याच्या पत्नी माधुरीला जेवायला वाढण्यास सांगितले. यावर तिने त्याला जेवण न बनवल्याचे उत्तर दिले. जेवण न दिल्याच्या रागातून तानाजीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायला सुरू केलं. यादरम्यान त्याने माधुरी हिच्या छातीवर जोर जोरात बुक्क्या मारल्या. या बेदम मारहणीनंतर माधुरी खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.