शिक्षिका शितल पगार यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार...
![शिक्षिका शितल पगार यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_65890bd76c100.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : मातोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती शितल सेनाजी पगार यांना; 2023 चा पेहचान प्रगती फाउंडेशन आदर्श शिक्षिका पुरस्कार, प्रगती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष प्रगती अजमेरा, बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, परिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्या हस्ते तसेच प्रगती फाऊडेशनचे सर्व सदस्य, राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी, पत्रकार भास्कर सोनवणे, राज्य आदर्श शिक्षक सिद्धार्थ सपकाळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
श्रीमती शितल पगार यांनी आज पर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची दखल या पुरस्कारासाठी घेण्यात आली. त्यांनी कोरोना काळात 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी 'घरोघरी शाळा' या नावीन्यपूर्ण उपक्रमाची नाशिक जिल्ह्यात प्रथम सुरुवात केली आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांना प्रवाहात ठेवण्यासाठी ऑनलाईन अध्यापन, विविध शैक्षणिक साहित्य निर्मिती, घरोघरी जाऊन मोफत शैक्षणिक साहित्य संच वाटप, साहित्याच्या वापरासंबंधी पालकांचे समुपदेशन, वारंवार गृहभेटी वैयक्तिक मार्गदर्शन, ई-कंटेट निर्मिती त्याचप्रमाणे राज्यस्तरावर शासनातर्फे सुरू व्हर्चुअल क्लासेस, राज्यस्तरीय दीक्षा ॲप समृद्धीसाठी ई-कंटेंट निर्मिती असे विविध उपक्रम राबवले आहेत.