BIG BREAKING : खालूब्रे गावात एकाच खून, आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये येणाऱ्या खालूब्रे गावात गणेश अनिल उर्फ अण्णा तुळवे(अंदाजे वय -३६ वर्षे)नामक व्यक्तीचा निर्घृणपणे धारधार शस्त्राने खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीच्या शोधासाठी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या पोलिसांचे पथके विविध ठिकाणी रवाना झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार खून करणारा आरोपी हा खून झालेल्या व्यक्तीच्या भावकीतीलचं असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पथके रवाना केले आहेत. घटनास्थळी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस दाखल झाले आहेत.
सध्या चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे दिसून येत आहे. खून, चोऱ्या, मारामाऱ्या आदी घटना वाढत असल्याचे प्रथमदर्शी दिसून येते. यावर बाहेरून आलेल्या कामगार तसेच ते ज्या ठिकाणी विना पुरावा राहत असल्याचे दिसून येत आहे. औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी वाढण्याला परिसरातील रूम मालकही मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत. आपल्याकडे आलेल्या भाडेकरूची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला देणे बंधनकारक असतानाही हे रूम मालक जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष करतात. यातूनच गुन्हेगारी फोफावत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून अशा गंभीर घटना घडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही घटना अपवाद सोडून यामागील घटना या बाहेरच्या कामगारांच्या बाबतच घडल्या असल्याचे दिसून आले आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी सतर्क होऊन अशा घटनाना आळा घालण्यासाठी आपल्या भाडेकरूची माहिती पोलिसांना कळवणे क्रमप्राप्त आहे.
या घटनेचा योग्य असा छडा महाळुंगे MIDC पोलीस लावतीलच यात शंका नाही. पण अशा घटना का घडतात याच्या खोलापर्यंतही जायला हवे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.