दिंडोरीत ३५ वर्षीय युवकाची हत्या...

दिंडोरीत ३५ वर्षीय युवकाची हत्या...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथे अज्ञात कारणावरुन एका ३५  वर्षीय युवकाला गंभीर दुखापत करुन मारहाण केली.त्यात त्याचा मृत्यू झाला असून पुरावा नष्ट करण्यासाठी प्रेत विहीरीत टाकून देण्याचा प्रकार गुरुवार दि.९ रोजी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी येथील अनिल पोपट गायकवाड (३५) यांच्या घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या एका विहीरीत मृतदेह आढळला.याबाबत दिंडोरी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.प्रेत बाहेर काढल्यानंतर सदर मयताच्या डोक्यावर व हाताच्या पंजावर हत्याराने मारुन गंभीर दुखापत केल्याचे निदर्शनास आले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक तपास केला  असता मयत अनिल गायकवाड याचे रवळगाव येथील एका महिलेशी अनैतिक प्रेम संबंध होते.त्यामुळ तिच्या भावाकडून अनिल गायकवाड याचा खुन केला असावा,अशा संशयाची फिर्याद मयत झालेल्या युवकाच्या भावाने दिंडोरी पोलिस ठाण्यात दिली आहे.संशययितास ताब्यात घेवून अधिक तपास दिंडोरीचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन आवारे व दिंडोरी पोलिस करीत आहे.