खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास गुंडा विरोधी पोलीस पथकाने केली अटक...

खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधारास गुंडा विरोधी पोलीस पथकाने केली अटक...

प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, चाकण

भावाचा खून करणाऱ्या आरोपीच्या मित्राचे अपहरण करुन बदला घेण्याचे इराद्याने निघृण खून करुन मृतदेह वापी (गुजरात) येथे जाळून विल्हेवाट लावणाऱ्या मुख्य सुत्रधारास पिंपरी चिंचवड गुंडा विरोधी पोलीस पथकाने जेरबंद केले आहे.

 कु आदित्य युवराज भांगरे (वय १८ वर्ष रा. भांगरेवस्ती, द्वारका सिटी जवळ, महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे ) युवकाच्या खूनातील मुख्य सूत्रधार राहुल संजय पवार( वय.३४ वर्षे, रा. हिताची कंपनीसमोर, पैराडाईज हॉटेलमागे, महाळुंगे (इंगळे) ता. खेड, जि. पुणे ) यास अटक करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांपूर्वी १ शंभु भोसले, २. अमि जावळे, ३. वैभव आंधळे, ४. विनोद बटलवार, ५. शेखर नाटक, ६. छोटा साकेत यांनी इसम नामे रितेश संजय पवार रा. हिताची कंपनीसमोर, पॅराडाईज हॉटेलमागे, महाळुंगे (इंगळे), ता. खेड, जि.पुणे याचा खून केला होता. रितेशचा भाऊ राहुल संजय पवार हा शंभु भोसले व त्याचे मित्रांना सोडणार नाही, त्यांचा बदला घेणार असे म्हणत होता. आदित्य भंगारे यांची मैत्री गहाळुंगे गावातील शंभु मोसले नावाचे मुलासोबत होत्ती. 

दरम्यान त्या खूना संदर्भातील वादग्रस्त पोस्ट आदित्य भांगरे याने इंस्टाग्रामवर लाईक व शेअर केल्याने मवत रितेश पवार याचे खुनाचा बदला घेण्यासाठी त्याचा भाऊ राहुल संजय पवार रा. सदर याने व त्याचे साथीदारांनी दिनांक २/२४ ला आदित्य युवराज भांगरे अपहरण केले होते.त्यानंतर दि.१८/०३/२०२४ रोजी रात्री २२:३० चे सुमारास राहुल संजय पवार याने त्याचे दोन साथीदारासह रासे येथे शिक्रापुर रोडवर असलेल्या मराठा हॉटेलचे मालक स्वप्निल ऊर्फ सोप्या सजय शिंदे  याचेवर त्याचे हॉटेलमध्ये गावठी पिस्तुलाने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता,तसा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात दाखल होता, सदर गुन्हयातील आरोपी अमर शिंदे याचेकडे तपास करता राहुल पवार व त्याचे साथीदाराने अपहृत आदित्य भांगरे यास जिवे मारुन त्यास वापी, गुजरात येथे नेऊन त्याच जाळले असले बाबत माहीती दिल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता आदित्य भांगरे याची मयत बोंडी मिळून आली. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास केल्यावर आरोपी राहुल संजय पवार हा स्वतःची ओळख लपवून फिरत होता.पिंपरी चिंचवड गुंडा विरोधी पथकाने राहुल संजय पवार यास औध परीसरातुन ताब्यात घेण्यात आले.पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.