BIG BREAKING : मोई गावात जबरी चोरी, चोरट्यांनी ३० लाखाचा ऐवज लुटला..!
![BIG BREAKING : मोई गावात जबरी चोरी, चोरट्यांनी ३० लाखाचा ऐवज लुटला..!](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_658ac4f7cf146.jpg)
News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : औद्योगिक वसाहत क्षेत्रातील मोई गावातील नितिन शहाजी कर्पे यांच्या घराच्या जिन्याचे गज कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करून तब्बल ३० लाख ४८ हजार ४०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आल आहे.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीवरून,दिनाक २५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता ते रात्री ९:४५ वाजताच्या सुमारास मोई गावातील इंडियन पेट्रोल पंपाशेजारी. मोई निघोजे रस्त्यालगत फिर्यादी नितिन शहाजी कर्पे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागच्या बाजूच्या जिन्याजवळील खिडकीचे लोखंडी ग्रीलचे बार कापून घरात प्रवेश करून घरातील सहा बेडरूम मधील वेगवेगळ्या लाकडी कपाटे यांची लॉक तोडून त्यातील तब्बल ४७.८ तोळे वजनाची सोन्याची अंगठी, मिनी गंठण, राणीहार, चैन, अंगठ्या, कानातील कर्णफुले जोड, बांगड्या, ब्रेसलेट कडे व तीन लाख अट्ठेचाळीस हजार चारशे रुपये रोख रक्कमेसह एकूण ३० लाख ४८ हजार ४०० रुपये चोरट्यांनी घरफोडी करून जबरी चोरी केली आहे. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात महाळुंगे MIDC पोलिस ठाण्यात भा. द. वि. कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चोरट्यांना अटक करण्यासाठी महाळुंगे पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांचं बरोबर गुन्हे शाखा युनिट-३ चे पथकही आरोपींचा शोध घेत आहे.
वरील चोरीच्या संदर्भात महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्याकडून परिसरातील ज्वेलरी व्यावसायिक यांना आव्हान करण्यात येते की, अशा पद्धतीचे बिगर बिलाचे सोने आपणाकडे विक्रीस आले तर, अशा संबंधित व्यक्तीची किवा समूहाची माहिती तात्काळ महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याला कळवायची आहे. सर्व ज्वेलरी व्यावसायिक यांनीही आपला व्यवसाय करताना अशा प्रकारचे सोने विकत न घेता अशा व्यक्तीची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला कळवायला हवी. तुमच्या सतर्क्तेमुळे अशा घटनांना चाप बसेल.
वरील घटनेचा तपास महाळुंगे MIDC पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके करत आहेत.