40 वर्षीय नराधमाचा मतिमंद मुलीवर बलात्कार.! भोजला येथील धक्कादायक घटना

40 वर्षीय नराधमाचा मतिमंद मुलीवर बलात्कार.! भोजला येथील धक्कादायक घटना

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  किरण मुक्कावार, यवतमाळ

राज्यात मागील काही दिवसांपासून महिला / मुलींवर अत्याचाराच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशातच पुन्हा: एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका 40 वर्षीय नराधमाने मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आली आहे.

मिळेल्या माहितीनुसार; यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्यातील भोजला येथे एका 40 वर्षीय नराधमाने 30 वर्षीय मतिमंद युवतीवर बलात्कार केला आहे. या बाबत वसंत नगर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून, आरोपी नाना मुकिंदा धुमाळे राहणार भोजला ह्यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

11 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 वा.च्या सुमारास पीडित युवतीचा मतिमंद पणाचा गैरफायदा घेऊन, भोजला येतीलच एका घरात पीडितेला नराधमाने घेऊन जाऊन तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. तर या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे PSI योगेश पंढरीनाथ जाधव हे करीत आहे.