गाव चलो अभियान.! दिंडोरी भाजप शहराध्यक्षांचा/पदाधिकाऱ्यांचा मडकी जांब येथे मुक्काम...
![गाव चलो अभियान.! दिंडोरी भाजप शहराध्यक्षांचा/पदाधिकाऱ्यांचा मडकी जांब येथे मुक्काम...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65ca4145ad75e.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
भारतीय जनता पार्टीचे गाव चलो अभियान चालू असून या उपक्रमाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दिंडोरी शहर अध्यक्ष नितीन गांगुर्डे व दिंडोरी तालुका चिटणीस संजय बोडके व इतर भाजप पदाधिकारी इंदोरे मडकेजांब गावी मुक्कामी दाखल झाले. त्यांनी गावात मुक्काम करत मोदी सरकार कार्य प्रसार केला.
भाजप पदाधिकाऱ्यांनी इंडोरे मडकीजांब येथे जनसंपर्क अभियान राबवले. इंदोरे येथील माजी सरपंच धनराज कोरडे, लतालुका उपाध्यक्ष प्रभाकर काका वडजे, बूथ प्रमुख सागर दिघे यांनी नितीन गांगुर्डे, संजय बोडके, भैय्याराम तिवारी यांच्यासह भाजप पदाधिकारी यांचे स्वागत केले. यावेळी नितीन गांगुर्डे यांनी मोदी सरकारच्या सामाजिक न्याय, कृषी कल्याण योजना, सशक्त शेतकरी योजना, आरोग्य योजना, महिला विकासाच्या योजना यांच्यासह आदी योजनांची माहिती दिली. भैय्याराम तिवारी व संजय बोडके, प्रभाकर वडजे यांनी जनतेची संवाद साधला.
यावेळी उपक्रमाअंतर्गत इंदोरे बूथ क्र.२९१,२९२ ची मतदार यादी वाचून दाखवण्यात आली व बूथ समितीची यादी नितीन गांगुर्डे यांनी पाहिली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत गावकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गावातील मच्छिंद्र बेंडकुळे, शिवाजी दरगोडे, सुगंधा कोरडे, रेखा धात्रक, वर्षा धनराज कोरडे, रोहिणी लक्ष्मण गवळी, लीलाबाई गवळी, गणपत वडजे, सचिन दर गोडे, समा दरगोडे, शरद धात्रक, प्रवीण केदार, अरबाज शेख, विष्णू कोरडे, केदार बाबा आदी सहभागी झाले होते. संयोजन प्रभाकर वडजे यांनी केले. आभार सागर दिघे यांनी मानले.