पालखेड बंधारा ग्रामपंचायत उपसरपंचपदी बबलू गायकवाड यांची निवड...
![पालखेड बंधारा ग्रामपंचायत उपसरपंचपदी बबलू गायकवाड यांची निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202310/image_750x_65379bb1f224f.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड (बंधारा) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बबलू गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आवर्तन पद्धतीने मावळते उपसरपंच स्वप्निल पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड झाली आहे.
ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या निवडी दरम्यान उपसरपंच पदासाठी बबलू गायकवाड यांचा एकमेव अर्ज आल्याने; त्यांची बिनविरोध निवड विहित वेळेत करण्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामविकास अधिकारी प्रकाश बागुल यांनी केली.
यावेळी सभागृहात झालेल्या निवडणुकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा गांगुर्डे होत्या तर ग्रामपंचायत सदस्य पंडित हरणखुरे, सीमा गायकवाड, भावना गायकवाड, जयश्री चव्हाण, वैशाली गांगुर्डे, सदस्य उपस्थित होते. यावेळी उपसरपंच बबलू गायकवाड यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. गायकवाड यांनी सांगितले की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले.
ही निवडणूक सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब गायकवाड, चेअरमन नाना गायकवाड, रघुनाथ गायकवाड, काका गायकवाड, बबन पवार, छबू मटाले, मोहन गांगुर्डे, अन्वर सय्यद, संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध झाली. याप्रसंगी सचिन गायकवाड, मुख्याध्यापक अण्णा वानखेडे, रामनाथ पीठे, समाधान मिठे, संतोष सोनवणे अदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.