दादांना प्रत्येक जिल्ह्यात विरोधच; आधी पुणे आता सोलापूर.! मंत्री चंद्रकांत पाटलांवर पुन्हा झाली शाईफेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात...

दादांना प्रत्येक जिल्ह्यात विरोधच; आधी पुणे आता सोलापूर.! मंत्री चंद्रकांत पाटलांवर पुन्हा झाली शाईफेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात...

NEWS15 मराठी रिपोर्ट - सोलापूर

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, यावेळी त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. याआधी चंद्रकांत दादा'वर पुणे दौऱ्यावर असतांना पिंपरी चिंचवड शहरात शाइफेक करण्यात आली होती. तसाच किस्सा किरवत त्यांच्यावर रविवार रोजी संध्याकाळी सोलापूर येथे शाईफेक करण्यात आली आहे. त्यामुळं दादांना जाईल तिथ विरोध होताना दिसत आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला.खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली.स्थानिक पालकमंत्री हवा म्हणून यापूर्वीच चंद्रकांत पाटलांना सोलापुरात विरोध सुरू होता.त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असतांना हे कृत्य घडल्याने, त्यामुळं दादांच्या सुरक्षेवर देखील मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

खुद्द पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने यांनी कडेकोट सुरक्षा तैनात केली होती.मोठी सुरक्षा भिंत तोडून भीम आर्मीच्या अजय मैनदर्गीकर याने शाई फेकली. चंद्रकांत पाटलांचा पांढऱ्या शर्टवर शाई फेकल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्त साठी असलेल्या पोलिसांनी ताबडतोब अजयला ताब्यात घेतले.त्यावेळी त्याच्या हातात काळे झेंडे होते.