उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली, सुगाव येथील कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात प्रवेश...

उत्तमराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली, सुगाव येथील कार्यकर्त्यांचा बीआरएस पक्षात प्रवेश...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

चाकूर तालुक्यातील सुगाव येथील अनेक युवक कार्यकर्त्यांनी बीआरएस पक्षात भारत राष्ट्र समिती अहमदपूर चाकूर विधानसभेचे नेते उत्तमराव वाघ यांच्या उपस्थितीत हणमंतवाडी येथील संपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश केला आहे.

या प्रसंगी उत्तमराव वाघ यांनी विठ्ठल शिंदे, सदानंद कंधारे, राहुल कांबळे, अशोक हणमंते, अशोक अर्जुने, रमाकांत कांबळे, विनायक मस्के, भारत शिंदे, अंगद हणमंते, तुळशीराम कसबे, प्रदीप कांबळे, दयानंद अर्जुने, दत्ता सुरवसे, माणिक हणमंते आदींना बीआरएस पक्षात प्रवेश देवून स्वागत व सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी उत्तमराव वाघ यांनी येणाऱ्या काळात बीआरएस पक्षाच्या पाठीमागे सर्वांनी रहावे असे आवाहन केले. यावेळी विकास काळे, राहुल अर्जुने, रमेश अर्जुने, विशाल चव्हाण, पञकार माधव वाघ, ज्ञानेश्वर भोसले आदीसह अहमदपूर चाकूर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.