उद्या दिंडोरी येथे शिवसेनेची महत्त्वाची बैठक...

उद्या दिंडोरी येथे शिवसेनेची महत्त्वाची बैठक...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या सुचनेनुसार‌ नाशिक ग्रामीण उपजिल्हाप्रमुख सतीश देशमुख, मा.आ.रामदास चारोस्कर यांचे उपस्थितीत उद्या दिंडोरी येथे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रविवार दि.२२ रोजी सकाळी १० वा.दिंडोरी गेस्ट हाऊस येथे आयोजन केले आहे या

बैठकीस सर्व उपतालुकाप्रमुख, विभाग प्रमुख,उपविभाग प्रमुख, शिवसेनेचे व युवा सेनेचे सर्व आजी-माजी जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे 

युवा सेना तालुका अधिकारी निलेश शिंदे महीला आघाडी तालुका प्रमुख अस्मिता जोंधळे यांनी केले आहे.