राहुल गांधी यांचा अचानक लातुरात मुक्काम.! रात्री विमान उड्डाणाची सुविधा नसल्याने मुक्काम

राहुल गांधी यांचा अचानक लातुरात मुक्काम.! रात्री विमान उड्डाणाची सुविधा नसल्याने मुक्काम

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी आज सोलापूरची सभा आटोपून लातुर मध्ये मुक्कामी आले आहेत. आल्या बरोबर  हॉटेल ग्रँड इथं आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी त्यांचं स्वागत केले.

लातुर विमानतळ येथून ते दिल्लीकडे जाणार होते. मात्र सायंकाळ झाल्याने उड्डाण करणे शक्य नसल्याचे पायलटने सांगितले. त्याच बरोबर आमदार अमित देशमुख यांनी त्यांना मुक्काम करण्याची विनंती केली. त्यावरून राहुल गांधी मुक्कामी थांबले. सकाळी ते विमानाने पुढील प्रवासाला निघतील असं सांगण्यात आले आहे.