विठ्ठलनगरातील 33 केव्हीए लाईन भुमिगत करा : शैलाताई उफाडे
![विठ्ठलनगरातील 33 केव्हीए लाईन भुमिगत करा : शैलाताई उफाडे](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64d3555236732.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण, दिंडोरी
दिंडोरी शहरातील प्रभाग क्र. ८ मधील ३३ केव्हीए लाईन भुमिगत अथवा स्थलांतरीत करण्यात यावी अशी मागणी; दिंडोरी नगपंचायतीच्या नगरसेविका शैलाताई उफाडे यांनी तहसीलदार पंकज पवार व मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र.८ मध्ये विठ्ठलनगरमधुन ३३ केव्हीए लाईन गेलेली आहे. ही लाईन घरावरुन गेलेली असून, सदर लाईन अत्यंत धोकादायक आहेत. मागील वर्षी पावसाळ्यात एक तार देखील तुटून घरावर पडली होती. तार तुटल्याने घरगुती उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेली होती. सुदैवाने जिवीत हानी टळली. या ठिकाणी जीवीत हानी व मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लाईन भुमिगत अथवा शिफ्टिंग करण्यात यावी. यापुर्वी अनेक वेळा त्यांना तोंडी सूचना देण्यात आलेल्या आहेत. आजपावेत त्याबाबत कोणीही कार्यवाही केलेली नाहीत. तरी लवकरात लवकर महाराष्ट्र विद्यूत कंपनीने तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा विठ्ठलनगर येथील रहिवाशी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा; नगरसेविका शैलाताई उफाडे यांच्यासह विठ्ठलनगर येथील नागरिकांनी दिला आहे.