दिंडोरी येथे भारत टॅलेंटसर्च परीक्षा उत्साहात

दिंडोरी येथे भारत टॅलेंटसर्च परीक्षा उत्साहात

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : एज्यूमिट अकॅडमी आयोजित भारत टॅलेंट सर्च बीटीएस परीक्षा दिंडोरी येथे गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित करण्यात आली.२३८ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करता यावी त्याचे स्वरूप समजावे यासाठी एज्युमिट  या संस्थेने राज्यभरातील 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी या परीक्षेचे आयोजन केले. या परीक्षेचे महत्त्वाचे स्वरूप म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास करत असताना पायाभूत संख्याज्ञान आणि साक्षरता हे एफ एल एन चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पाठ्यपुस्तकात ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत त्या अध्ययनष्पत्तीच्या थीम नुसार या परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.

या परीक्षेसाठी तालुक्यातील   जि.प.शाळा करंजवन,जऊळके दिंडोरी,सोनजांब,लखमापुर,तळेगाव दिंडोरी,जानोरी,जालखेड,वाघाड,नवे धागुर,रासेगाव व ओझरखेड या शाळेतील  इयत्ता पहिली ते आठवी चे एकूण २३८ मुले बसली होती.

इयत्ता पहिली ते तिसरी साठी ५० प्रश्न असलेली शंभर गुणांची वेळ दीड तास व तिसरी ते आठवी करीता ७५ प्रश्न असलेली दीडशे गुणांची वेळ दोन तास आठवी असे परीक्षेचे स्वरूप होते. परीक्षा केंद्रावर एका वर्गात  २५ विद्यार्थ्यांचे एकूण १० ब्लॉक करण्यात आले होते.१० ब्लॉक साठी १० पर्यवेक्षक म्हणुन डी.एड कॉलेज दिंडोरी येथील विद्यार्थ्यांनी कामकाज पाहिले तर केंद्र संचालक नियंत्रक म्हणून प्रकाश चव्हाण,जयदीप गायकवाड,विश्वास पाटोळे यांनी भूमिका पार पाडली.मुलांसाठी वर्गात पंखे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली.यासाठी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापक सर्व कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले. पालक,विद्यार्थी यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला.