व्ही. एन. नाईक महाविदयालयात कॉमर्स फेस्टिवल उत्साहात संपन्न...
![व्ही. एन. नाईक महाविदयालयात कॉमर्स फेस्टिवल उत्साहात संपन्न...](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_641d2a64600b2.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक / दिंडोरी : व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्यावतीने २० मार्च ते २३ मार्च २०२३ दरम्यान; कॉमर्स फेस्टिवल विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून मोठया उत्साहात व जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गिते हे उपस्थित होते. तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संचालक विक्रम उगले उपस्थित होते.
प्रथमता क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या प्रातिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. संजय सानप, उपप्राचार्या डॉ. पौर्णिमा बोडके, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. धिरज झाल्टे, फेस्टिवलच्या समन्वयक डॉ. प्रा. रूपाली सानप, प्रा. हेमलता दराडे, प्रा. प्रकाश घरटे, डॉ. अर्चना हत्ते, प्रा. वैशाली वाघ, प्रा. रेश्मा कुटे, प्रा. महेश आव्हाड, प्रा. सीमा केदार यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विक्रम उगले व पी.आर.गीते प्राचार्य डॉ. संजय सानप यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. धिरज झाल्टे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित व्हावी; त्यांच्यातील सर्जनशीलतेला व सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे.! यासाठी ह्या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. कॉमर्स फेस्टिवल अंतर्गत मुलाखत कौशल्य स्पर्धा, पोस्टर प्रेझेंटेशन, याड माय शो स्पर्धा (जाहिरात), टॅलेंट सादरीकरण, मिस व मिस्टर कॉमर्स स्पर्धा, मार्गदर्शनपर व्याख्यान आदि उपक्रम उत्साहात संपन्न झाले. फेस्टिवल मधील स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष पगारे याने केले; तर आभार सुहानी गवते यांनी मानले.