महिला पोलीस अंमलदार कक्षाचे पोलीस आयुक्त यांचे हस्ते उद्घाटन संपन्न, उपलब्ध व प्राप्त सुविधांचे आधारे कामगिरीमध्ये गुणवत्ता वाढविण्याबाबत पोलीस आयुक्तांचे मार्गदर्शन.....!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत महाळुंगे एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनचे आवारामध्ये महिला पोलीस अंमलदार यांचे करीतानेक्सटीयर ऑटोमोटीव्ह इंडीया प्रा.लि. कंपनी महाळुंगे यांचे सहकार्यातुन रोटरी क्लब एन.आय.बी.एम. पुणे यांचे प्रयत्नातुन सुसज्य अशी महिला अंमलदार कक्षाची उभारणी करण्यात आली होती. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनय कुमार चौबे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे वेळी बोलताना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले की, महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे महाळुंगे एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशनची नुकतीच निर्मीती करण्यात आलेली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे नविन असल्याने त्यासाठी उपयुक्त अशी साधनसामुग्री व सुखसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत शासनस्तरावरुन योग्यती कार्यवाही सुरु आहे.

पोलीस ठाण्यातील महिला अंमलदार यांचे कर्तव्याचे कालावधीची अनिश्चिततामुळे महिला अंमलदार यांना पोलीस ठाण्यातच विश्रांती घेण्यासाठी, गणवेष बदली करणे या करता स्वतंत्र महिला कक्षाची आवश्यक्ता होती. ती नेक्सटीयर ऑटोमोटीव्ह इंडीया प्रा.लि. कंपनी महाळुंगे यांचे सहकार्यातुन पुर्ण करण्यात आली. अशीच मदत एम.आय.डी.सी.मधील इतर मोठया कंपन्यांनी केलीतर नक्कीच महाळुंगे एम.आय.डी.सी.पोलीस ठाणे सुविधांचे बाबत अग्रभागी गेल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात कंपन्यांच्या मदतीमुळे पोलीस प्रशासनाचे कामकाजामध्ये उत्साह वाढुन पर्यायाने जनतेला व कंपन्यांना वेळेत तत्पर सेवा भेटण्यास मदत होईल. तसेच पोलीस बांधवांना ज्या सेवा उपलब्ध आहेत व भविष्यात ज्या सेवा उपलब्ध होणार आहेत यातुन जनतेच्या व औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या अडी अडचणी सोडविण्यास तत्परता दाखवावी, असे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या पोलीस पाटील यांना मार्गदर्शन करुन पोलीस पाटील यांना त्यांचे कर्तव्य व जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस पाटील हे जनता व पोलीस यांचे मधील महत्वाचा दुवा असल्याने पोलीस पाटील यांना त्यांचे कर्तव्यामध्ये काही अडचणी येत असल्यास त्या सोडविण्याची ग्वाही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बोलताना दिली.

महाळुंगे एम.आय.डी.सी. परिसरातील औद्योगिकीकरणाची व पोलीस ठाण्याची व्याप्ती बघता नविन ठिकाणी पोलीस ठाण्याची सुसज्य इमारत आवश्यक असल्याचे सांगुन पोलीस ठाण्याचे इमारती करीता एम.आय.डी.सी.कडुन प्राप्त जागेची पाहणी केली. त्यासंदर्भातील इतंभुत अहवाल सादर करण्याच्या सुचना महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना पोलीस आयुक्त यांनी दिल्या.
सदर कार्यक्रमावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-१ विवेक पाटील, महाळुंगे पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, चाकण पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण, विलास गोसावी, दत्तात्रय जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक संगिता भंडरवाड व सर्व पोलीस अंमलदार, सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता समिती सदस्या आदी.उपस्थित होते.