रोटरी क्लबच्यावतीने; जनता विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप...
![रोटरी क्लबच्यावतीने; जनता विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66bc76eeac42a.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्ट यांच्यावतीने ननाशी येथील गजानन महाराज शैक्षणिक व क्रीडा मंडळ देवळा संचलित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक आणि विद्यार्थी यांना उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
आदिवासी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतांना अनेक भौतिक सुविधाचा अभाव असतो त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक एअरपोर्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येतो.या उपक्रमांतर्गत जनता विद्यालयाला संगणक, वॉटर फिल्टर, डेस्क, व्हाईट बोर्ड आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव सावंत,अध्यक्ष तुषार सावंत, प्रा.डी.एन.आहिरे आदिनी रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष धीरज दळवी यांनी रोटरी क्लब ऑफ नाशिक एअर पोर्ट च्या सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच गजानन महाराज शैक्षणिक व क्रीडा मंडळ देवळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्करराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. रोटरी क्लब आणि विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यालयाच्यावतीने रोटरी च्या सर्व पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष विनोद जाधव, विनोद लाल, सचिव अक्षय पटेल, सदस्य प्रमोद रोनाड, दीपक मोरे शिक्षकवृंद विद्यार्थी उपस्थित होते.