संधान यांच्याकडून स्वखर्चाने यात्रा निमित्ताने विद्युत रोषणाई...

संधान यांच्याकडून स्वखर्चाने यात्रा निमित्ताने विद्युत रोषणाई...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सोसायटीचे संचालक शिवानंद यांनी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खंडेराव महाराज यात्रा निमित्ताने; गावामधील तुळजाभवानी चौकात विद्युत पोल व रोशनी लाइटिंग देऊन चौकामध्ये लखलखाट केला आहे.

या आधी त्यांनी काही दिवसांपूर्वी येथील एल.जी. पाटील विद्यालयाला आहाराच्या धान्याचे मोजमाप करण्यासाठी १०० किलोचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा, तसेच हाय मास्ट लॅम्प व सीसीटीव्ही कॅमेरे दिले होते. आणि आता यात्रेनिमित्ताने विद्युत रोशनी करून दिल्यामुळे नागरिकांनी शिवानंद संधान यांचे आभार मानले आहे.