खराबवाडी गावातील सारा सिटी डी फेज आर्थिक घोटाळ्याच्या गर्तेत...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटी "डी फेक" मध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार सुरु असल्याने सदनिका धारकांचे धाबे दनाणले आहेत.
सारा सिटी "डी फेज" मध्ये ऑक्टोबर २०२१ ला प्रत्येक्ष निवडणूक प्रक्रिया राबवून नवे कारभारी सत्तेत बसले. तर का मागील कारभाऱ्यांच्या कारभाराला सदनिका धारक कंटाळले होते म्हणून नव्या शिलेदार यांना मोठ्या मतांधिक्यानी निवडून दिले. डी फेज मधील बऱ्याच सदनिका धारक यांना नवीन कारभारी काहीतरी नवीन करतील अशी मनोमन आशा बाळगून होते. पण झाले उलटे हे तर पहिल्यांपेक्षा भयंकर निघाले. सगळंच बेकायदेशीरपणे वसुली करून त्याचा कोणताच हिशोब न देता स्वतःचे खिसे भरण्यात नव्या कारभारी यांनी धन्यता मानायला सुरुवात केली. यावर जो कोणी आवाज उठवेल त्याला पोलीस ठाण्याची भीती दाखवायची आणि त्याला गप्प करायच असा अजेंडा विद्यमान कारभारी यांनी राबवला आहे.
सोसायटीच्या कारभारात मोठी अनियमितता आहे यावर सहाय्यक निबंधक खेड यांच्याकडे काही सदनिका धारक सभासद यांनी तक्रारी करूनही काही उपयोग झाला नाही. तर काही कारभारी तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा आमचे कुणी वाकड करू शकत नाही असाही सुका दम भरत आहेत. नव्या कारभारी यांनी देखभाल खर्चाचा हिशोब दिला नाही, मागील कर्ज भरण्यासाठी वार्षिक बैठकीत ठराव न करता बेकायदेशीर पर सदनिका पाच हजार रुपयानी वसुली केली, जर मागील कर्ज होते तर तुम्ही पदावर आल्यावर मागील हिशोब जुळवून सोसायटीचा कारभार हातात घ्यायला हवा होता. तो का घेतला नाही हाही अनुत्तरीत प्रश्न आहे. एवढेच नाही तर दर गुरुवारी सोसायटीच्या लिफ्ट बंद राहत असतील तर, महिन्याला २५ हजाराचे डिझेल स्वतःच्या गाडीत टाकता का? हाही प्रश्न सदनिका धारक विचारू लागले आहेत. त्याच बरोबर नव्या कारभारी यांचे नेतृत्व करणारा चेअरमन हा बहुतेक दिवस गावाला आणि काही निवडक दिवसचं सोसायटीत राहतो तर मग सोसायटीचा कारभार रामभरोसे सुरु असल्याचा आरोप सदनिका धारक करत आहेत. जर कारभारी देखभाल खर्च वसुल करतात तर ते सेवा देणाऱ्या कंपनीचे पैसे का थकवतात. यावरही कारभारी बोलायला तयार नाहीत. सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर सदनिका विक्रीचे व्यवहार झाले आहेत त्यासाठी देण्यात येणाऱ्या ना -हरकत प्रमाणपत्रांसाठी ठरविण्यात आलेल्या रकमेचा आतापर्यंत कारभारी यांनी हिशोबच दिला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. बर त्या सोसायटीत सगळे सदनिका धारक हे सर्वसामान्य आहेत. सकाळी कामावर जायचे आणि आपली १० ते १२ तासाची शिप करून घरी यायचे. महिन्याकाठी जे पैसे भेटतील त्यातून कारभारी यांना आयता देखभाल खर्च पण द्यायचा आणि सदनिकेचा हप्ता पण भरायचा. त्या बदल्यात सदनिका धारकांना कधी पाणी वेळेवर नाही, कधी लाईट वेळेवर नाही, कधी लिफ्ट चालू नाही अशा एक ना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. कारभारी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांना पैसे कमी पडू लागले तर त्यांनी लिफ्टला काही तरी खोळबा दाखवून त्या बिलातूनही पैसे काढण्याचा प्रताप करत असल्याचे दिसून आले आहे. लिफ्ट देखभालीचा कोणताही हिशोब हे कारभारी सोसायटीला दयायला तयार नाहीत. त्यामुळे सारा सिटी डी फेजच्या कारभाऱ्यांच्या कारभारावर आता सदनिका धारक आक्रमक होताना दिसत आहेत. जर असाच कारभार हे कारभारी करत राहिले तर त्यांना लवकरच जेलची हवा खावी लागेल यात शंका नाही. या सोसायटीच्या कारभाराच्या बद्दल अजून अनेक धक्कादायक खुलासे लवकर चव्हाट्यावर येणार आहेत. त्यामुळे आता सदनिका धारक यांनी एकत्र येऊन अशा मलिदा खाणाऱ्या कारभारी यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडायला हवी. नाहीतर पोटाला चिमटा काढून घेतलेले स्वप्नातील घर हे स्वप्नावर दगड ठेऊन एखाद्या दिवशी सोडून जावे लागेल यात शंका नाही.