BIG BREAKING : चाकण-तळेगाव रस्त्यावर वाहतूक कोंडी, वाहनाच्या लांबच लांब रांगा...!

News15 मराठी प्रतिंनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : सध्या चाकण शहर आणि औद्योगिक परिसरात वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आले असतानाच आज खराबवाडी गावातील महादेवी मंदिराच्या समोरील गटारात मोठा दहा चाकी ट्रक फसल्याने चाकण-तळेगाव रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
अगोदरच चाकण-तळेगाव रस्त्याला भले मोठे खड्डे पडल्याने वाहने संथ गतीने जात आहेत. त्यामुळे रोजचं वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आज मोठा ट्रक फसल्याने चाकण-तळेगाव रस्त्यावर अक्षरश: वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रोजच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांच्या राजकीय नेत्याच्या विरोधात अतिशय संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
स्थानिक नागरिक सांगतात की, जगाच्या नकाशावर चाकण खूप बदललेले दिसत आहे पण चाकण-तळेगाव रस्ता अजून जशाचा तसाच असल्याचे स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत. राजकीय नेते स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी सत्तेचा सारीपाठ खेळत आहेत त्यांना कोणत्याही जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची तीव्र भावना स्थानिक नागरिक बोलून दाखवत आहेत.
चाकण-तळेगाव रस्ता अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर आज वाहतूक कोंडी झाली आहे. ती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पाऊस सुरू असल्याने कमीत कमी दोन तासाच्या पेक्षा जास्त वेळ लागू शकतो तरी चाकण-तळेगाव रस्त्याने प्रवास करणार्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा.