आदर्शवत : मराठा समाजाच्या लग्न आचारसंहितेनंतर पहिला आदर्श विवाह सोहळा देहूत संपन्न..!

आदर्शवत : मराठा समाजाच्या लग्न आचारसंहितेनंतर पहिला आदर्श विवाह सोहळा देहूत संपन्न..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

देहूगाव : सध्या महाराष्ट्रभर मराठा समाजातील लग्नातील बेसुमार खर्चाच्या बाबत मोठी चर्चा होताना दिसत आहे. मराठा समाजाच्या लग्नात बेसुमार खर्च करून पुढे जाऊन त्या विवाहित मुलीला कौटुंबिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. याच अवास्थव लग्नातील खर्च टाळण्यासाठी अहिल्यनगर मराठा समाज बांधवानी पुढाकार घेऊन लग्नासाठी एक आचारसंहिता बनविण्याचा निर्णय घेतला आहे.

याच आचारसंहितेची आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. त्यात आता मराठा सामाज्याची लग्ने ही साध्या पद्धतीने व्हावीत असा ठराव करण्यात आला आहे. त्याच आचारसंहितेच्या अनुषंगाने देहूगावात असाच छोटासा आणि मराठा समाजला शोभेल असा विवाह सोहळा संपन्न झाला. मूळ बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील रहिवाशी असणारे दिगंबर बळीराम देवडकर यांचे चिरंजीव राजेश व श्रीमंत सखाराम काळे यांची कन्या माधुरी यांचा विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने देहूगावातील संत तुकाराम हॉलमध्ये पार पडला.. लग्नात अतिशय मोजके लोकांची उपस्थिती, प्री वेडिंग या पाश्चिमात्य संस्कृतीला फाटा, अतिशय कर्कश असलेले डी जे वाद्या ऐवजी परंपारिक वाद्यांचा वापर, महत्वाचे म्हणजे लग्न अतिशय ठरल्या वेळेत लागले, नवरा नवरीला हार घालताना वर उचलून घेतले नाही. त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. अशा साध्या विवाहसोहळा पार पडला याचे परिसरात सगळीकडे कौतुक होत आहे.