विळवंडी जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप...

विळवंडी जि.प.शाळेत विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील विळवंडी येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पीएफईपी एल मुंबई या कंपनीकडून विद्यार्थ्यांना रेड ग्रीन ब्ल्यू येलो या चार हाऊस नुसार उत्तम दर्जाचे टी-शर्ट व स्पोर्ट पॅन्ट कंपनीच्या डायरेक्टर सितारा काझी विस्तार अधिकारी वंदना चव्हाण यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याशिवाय दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची अधिक माहिती व्हावी यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

दुर्गम भागातील सर्व सुविधांनी सुसज्ज इमारत व शालेय परिसर पाहून सर्व मान्यवरांनी कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांना दिवाळीपूर्वी मिठाई व फराळासाठी रोक रक्कम देण्यात आली.याप्रसंगी कंपनीचे पदाधिकारी ग्रामस्थ शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.