सामाजिक : एक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या आगरवाडी ते राक्षेवाडी रस्ता डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : मागील एक वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक सात मधील आगारवाडी ते राक्षेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अखेर सुरु झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या कामासाठी मागील एक वर्षांपासून प्रभाग नगरसेविका अनिता दिलीप कौटकर व खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अथक प्रयत्नांने अखेर बहूप्रतीक्षित रस्त्याच्या डांबरी करणाचे काम सुरु झाले आहे. काही लोकांनी रस्त्याच्या कामाचे आपल्याला श्रेय मिळावे यासाठी नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप नगरसेविका अनिता कौटकर यांनी केला. हा रस्ता कला, वाणिज्य महाविद्यालयापासून ते राक्षेवाडी काळुस फाटा पर्यंत पूर्णतःवास नेण्यात येणार आहे. बरीच वर्षे या रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. पण आता प्रत्येक्षात रस्त्याचे उत्कृष्ट काम सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामावर स्वतः चाकण नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.
प्रतिक्रिया :१
या रस्त्यासाठी मी व माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी प्रयत्न करून मंजुरी मिळवून घेतली आहे. आज काम सुरु झाल्यानंतर काही लोकांनी यात राजकारण करायला सुरुवात केली आहे. राजकीय स्वार्थासाठी काही लोक सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहेत. पण कुणी काहीही राजकारण केले तरी हा रस्ता कुणी व कसा मंजूर केला हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे आम्ही राजकारणापेक्षा कामाला प्राधान्य देणारे लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे ज्याला राजकारण करायचे त्यांनी खुशाल राजकारण करावे..
-अनिता कौटकर, नगरसेविका, चाकण नगरपरिषद
प्रतिक्रिया : २
या रस्त्याच्या कामासाठी कुणी किती परिश्रम घेतले आहे हे मी एक प्रभागातील नागरिक म्हणून पाहिले आहे. अतिशय उत्कृष्ट असे काम सुरु आहे. या कामावर स्वतः चाकण नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे रस्त्याचे जे काम सुरु आहे त्यावर आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून समाधानी आहोत. माझी विनंती आहे कि, जे कोणी या कामात राजकारण करत असतील त्यांनी विकास कामात राजकारण न करता ते काम कसे पूर्णतःवास नेता येईल या दृष्टीने विचार करायला हवा.
-यशवंत राक्षे, स्थानिक नागरिक