मधुरा महिला मंडळाकडून जनता इंग्लिश स्कूलला ढोल व ड्रम भेट...
![मधुरा महिला मंडळाकडून जनता इंग्लिश स्कूलला ढोल व ड्रम भेट...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66b38ae8d209a.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७१४ व्या संजीवनी समाधी सोहळा पुण्यतिथीनिमित्त दिंडोरी येथील मधुरा महिला मंडळाकडून जनता इंग्लिश स्कूलला ढोल व ड्रम भेट देण्यात आले.
यावेळी पुण्यतिथी निमित्त दिंडोरी शहरातून पालखी फेरी काढण्यात आली. गावातून मधुरा महिला मंडळ, जनता इंग्लिश स्कूल बँड पथक विद्यार्थी व लेझीम सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थिनी आणि मधुरा महिला मंडळातील सर्व महिला लेझीम पथक अतिशय उत्कृष्ट असे लेझीमचे सादरीकरण करून गावातील फेरी ही आकर्षक ठरली. पथकामध्ये २५ महिलांनी सहभाग घेऊन लेझीम डान्स सादरीकरण उत्कृष्ट प्रकारे केला.दिंडोरी गावातील विठ्ठल मंदिरापासून सुरुवात होऊन संपूर्ण दिंडोरी गावात त्यानंतर संत नामदेव महाराज मंदिर शिवाजीनगर पर्यंत पालखीची मिरवणूक काढण्यात आली.तसेच शिंपी समाज मधुरा महिला मंडळातर्फे विद्यालयास ढोल व ड्रम सप्रेम भेट देण्यात आला. विद्यालयाचे उपप्राचार्य यु डी भरसट सर यांनी ढोल व ड्रम स्वीकारून आलेल्या सर्व महिलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.तसेच या पथकाला लेझीमचे मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संजय मोगल सर यांना सरस्वती माता मूर्ती, शाल टोपी व श्रीफळ देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे उप उपप्राचार्य उत्तम भरसठ, पर्यवेक्षक श्रीमती प्रतिभा मापारी, सविता शिंदे,रावसाहेब उशीर,तसेच मधुरा महिला मंडळ अध्यक्ष उज्वला ज्ञानेश्वर धोंगडे सदस्य मयुरी खंडारे सदस्य स्नेहल खंदारे सदस्य वृषाली गायकवाड सदस्य प्रिया गायकवाड सदस्य अश्विनी गायकवाड सदस्य वंदना चुंबळे सदस्य मेघना टाळकुटे सदस्य रश्मी नवले,कीर्ती नवले, रूपाली कोंडीलकर,शुभांगी तूपसाखरे प्रीती धोंगडे ,जयश्री गायकवाड, सोनाली देशमानकर,सावली धोंगडे,नीता धोंगडे,जानकी चुंबळे,सारिका धोंगडे,दर्शना नवले, श्वेता धोंगडे,प्राजक्ता नवले,आदीं महिला शाळेचे क्रीडाशिक्षक एस. बी. मोगल, बी जे देवरे,एस एस आहेर व इतर शिक्षक उपस्थित होते.
प्रास्तविक जेष्ठ शिक्षिका सुमन वीरकर यांनी केले.
पुण्यतिथी कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या सहभागी झालेल्या विद्यार्थिनी यांचाही महिला मंडळाच्या वतीने पेन देऊन सन्मान करण्यात आला.उपशिक्षिका सरला कदम यांनी सूत्रसंचालन केले तर संतोष कथार यांनी आभार मानले.