लोकतंत्र का करो सन्मान, शत प्रतिशत करो मतदान.! कादवातील विद्यार्थ्यांचे मतदान जनजागृती अभियान

लोकतंत्र का करो सन्मान, शत प्रतिशत करो मतदान.! कादवातील विद्यार्थ्यांचे मतदान जनजागृती अभियान

 प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

 कर्मवीर रा.स.वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था संचलित कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापुर येथे मतदान जनजागृती अभियान अंतर्गत; आपली जबाबदारी व अधिकार मजबूत लोकशाहीचा आधार जना-मना ची पुकार आहे. मतदान आमचे अधिकार आहे. लोकतंत्र का करो सन्मान शत प्रतिशत करो मतदान.!

आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूकपूर्वी मतदार नोंदणी वाढवणे,मतदानाचा टक्का वाढविणे,मतदान जनजागृती करण्यासाठी पालकास पत्र लेखन,मेहंदी स्पर्धा,निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, मतदान जनजागृती रॅली,पालक मेळावा,राष्ट्रिय मतदार दिनाची प्रतिज्ञा घेणे,मतदार जनजागृती पथ नाट्य, तसेच प्रत्येक प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान जनजागृती निम्मित आपल्या पालकांसोबत सेल्फी काढून उपक्रम राबविला.

 शिक्षकांनी गावात जाऊन स्वतःविदयार्थी समवेत मतदान जनजागृतीचे भिंतीवर पोस्टर लावले, तसेच मतदान जन जागृती अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भारताच्या नकाशाच्या आराखड्यातून संकल्पना मांडून त्यामधून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो हा संदेश या मार्फत देण्यात आला.या सारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यानी आपल्या माध्यमातून उपक्रम राबविण्यासाठी तयार केले आहेत.या मतदान जनजागृती अभियान अंतर्गत सर्व उपक्रम राबविण्यासाठी कादवा इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लखमापुर च्या ७७४  विद्यार्थ्यानी सहभाग घेतला व यामध्ये प्रा.व्ही.आर.जाधव यांनी स्वतः उपक्रम राबवित सर्व शिक्षक शिक्षक वृंद,कर्मचारी,विद्यार्थी,पालक यांचे  सहकार्य लाभले.