अतुल वाघ यांना कादवा प्रतिष्ठानचा उद्योग क्षेत्रातील "कादवा गौरव" पुरस्कार जाहीर...!

अतुल वाघ यांना कादवा प्रतिष्ठानचा उद्योग क्षेत्रातील "कादवा गौरव" पुरस्कार जाहीर...!

News15 मराठी प्रतिनिधी बापु चव्हाण 

दिंडोरी : पालखेड बंधारा येथील कादवा प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना "कादवा गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. २०२३ या वर्षाचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे दिंडोरी येथील रहिवासी तथा उद्योजक अतुल वाघ यांना उद्योग क्षेत्रातील कादवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी जाहीर केले आहे.

अतुल वाघ यांना दि.१८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिक येथील परशुराम सायखेडकर नाट्यगृहात मान्यवरांच्या हस्ते कादवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती कादवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयकुमार मिठे व सरचिटणीस विठ्ठलराव संधान यांनी दिली आहे.