दिंडोरी येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबिर...

दिंडोरी येथे गुरुपौर्णिमा निमित्ताने रक्तदान शिबिर...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात रविवार दि.२१ रोजी; मालेगाव येथील सेवा ब्लड बँकच्यावतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सकाळी ९ ते ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी या शिबिरात भाग घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन; कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राचे संचालक आबासाहेब मोरे, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण व सेवा ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.