खेड तालुक्याचे सुपुत्र तसेच वासुली गावचे पोलीस पाटील अमोल वसंतराव पाचपुते यांची पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
पुणे : खेड तालुक्याचे सुपुत्र, वासुली गावचे पोलीस पाटील तसेच खेड तालुका पोलीस पाटील संघांचे माजी अध्यक्ष अमोल वसंतराव पाचपुते यांची पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

अमोल पाचपुते यांनी आपल्या पोलीस पाटील पदाला साजेसा न्याय देण्याचे काम केले आहे. त्याचं बरोबर त्यांच्या खेड तालुका पोलीस पाटील संघाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात यशस्वी अध्यक्ष म्हणून त्यांचा नवलौकिक संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांनी मिळवला होता. अमोल पाचपुते यांना घरातूनच सामाजसेवेचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडीला तब्बल १५ वर्षे गावचे सरपंच पद भूषविले तर त्यांचे चुलते हेही पोलीस पाटील म्हणून कार्यरत होते. हाच वसा आणि वारसा अमोल पाचपुते यांनी पुढे सुरु ठेवला आहे. अमोल पाचपुते यांनी त्यांच्या पदाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क आणि मोठा मित्र परिवार तालुक्यात जुळवला आहे. त्यातच आपल्या पोलीस पाटील पदाच्या माध्यमातून गावातील, तालुक्यातील अनेक अडचणीचे प्रकरणे अतिशय कौशल्यपूर्ण हातातून ती प्रकरणे न्याय कक्षेत जाऊन न देता परस्पर मिटवले असल्याने त्यांचा सामाज्यात एक मानणारा वर्ग तयार झाला आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य विधिमंडळ उपक्रम समितीचे अध्यक्ष व दौंड विधानसभेचे आमदार राहुलदादा कुल व महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या हस्ते हि नियुक्ती करण्यात आली.या कार्यक्रमाला राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण शितोळे, राज्य खजिनदार निळकंठ थोरात, पश्चिम विभागीय अध्यक्ष साहेबराव राळे, उपाध्यक्ष गोरख नवले पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटक अरुण केदारी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. तृप्तीताई मांडेकर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सौ. रोहिणीताई हांडे, राज्य सदस्य हनुमंत हंडाळ, दीपक पावडे, बळीराम गायकवाड, रंजना पिचड, गौतम लोखंडे, स्वप्नली परहाड, जिल्हा सचिव श्री जयसिंग भंडारे पाटिल, जिल्हा उपाध्यक्ष वाल्हेकर पाटील आदि. मान्यवर उपस्थित होते.