अनाथ मुलांसमवेत शशिकांत मोरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा...!

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
चाकण : शेलपिंपळगाव येथील संपर्क बालग्राम अनाथ आश्रमात मुलांना फळ वाटप व खाऊ वाटप करून शशिकांत मोरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क बालग्राम मधील मुलांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून व अनाथ मुलांना फळ वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. उपस्थित सरपंचांच्या वतीने सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांचा ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी राजे मोहिते, शेलपिंपळगावच्या सरपंच विद्याताई मोहिते, सिद्धेगव्हाणचे सरपंच दौलतराव मोरे, चिंचोशीच्या सरपंच उज्वलाताई गोकुळे, दौंडकरवाडीचे सरपंच सितारामशेठ गुजर, चेअरमन बापू मोहिते, माहिती सेवा समिती उपाध्यक्ष संतोष साबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती मोरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज मोरे, मंदाकिनी चव्हाण, प्रा. मनीषा मोरे, सुरेश गोकुळे, राहुल मोहिते, मारुती काका मोहिते, माजी सैनिक धनंजय धाऊत्रे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष जयसिंग धाऊत्रे, आत्माराम गाडे, अक्षय वाडेकर, अमोल धाऊत्रे, धीरज मोरे प्रणव शेळके, सौरभ मोरे आदी. मान्यवर उपस्थित होते.