खुर्दळ व अस्वले यांना स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील खतवडचे उपसरपंच तथा पत्रकार सुखदेव खुर्दळ आणि वरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बाळासाहेब अस्वले यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार निसर्ग मित्र समितीच्यावतीने "स्वामी विवेकानंद राष्ट्रीय प्रेरणा" पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते सटाणा येथे देऊन सन्मानित करण्यात आले.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार बापू चव्हाण, संतोष कथार, भगवान गायकवाड, अशोक निकम, संदीप गुंजाळ, विलास ढाकणे, अशोक केग बंडा खडांगळे आदींसह पत्रकार बांधव विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.