ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशनच्या (AIITA) उदगीर शहराध्यक्षपदी अझरोद्दीन शेख यांची निवड...!
![ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशनच्या (AIITA) उदगीर शहराध्यक्षपदी अझरोद्दीन शेख यांची निवड...!](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63dd1220282bf.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी अस्लम शेख
लातूर : ऑल इंडिया आयडियल टिचर्स असोसिएशनच्या (AIITA) उदगीर शहराध्यक्षपदी अझरोद्दीन शेख यांची निवड करण्यात आली.
उदगीर येथील जमहूर हायस्कूल येथे झालेल्या असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बहुमतानी निवड करण्यात आली.अध्यक्षपदी अझरोद्दीन शमशोद्दीन शेख तर उपाध्यक्ष हाफेज खालील,अब्दुल हाई पटेल व सचिव फारुखी रियाजोदीन रफिउदीन व कोषाध्यक्षपदी हाशमी अबुबकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष शेख अब्दुल वाजीद हे होते. या वेळी दायमी अब्दुल रहिम,शेख आय.जी. ,शेख मुजाहिद, शेख आयाज,शेख गौसोद्दीन,याफाई अहमद,शेख मतीन,हाशमी शोएब,शेख अखिल,शेख रफिक,शेख अकबर,चौधरी मजहर व सय्यद मुशीर या सोबतच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
उदगीर येथील उपक्रमशील शिक्षक अझरोद्दीन शमशोद्दीन शेख यांनी मागिल काळात अनेक समाजोपयोगी व शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य केल्यामुळे यांची उदगीर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अझरोद्दीन शेख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.