केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप...
![केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना फराळ वाटप...](https://news15marathi.com/uploads/images/202312/image_750x_65895dd4893a1.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिंडोरी येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना नुकतेच फराळ वाटप करण्यात आले.
रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे, ज्येष्ठ नेते रवी सोनवणे, युवक तालुका अध्यक्ष सागर गायकवाड, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बौद्ध महासभेचे चंद्रकांत गांगुर्डे, अमोल निकम, मुकुंद गांगुर्डे, महिला आघाडीचे तालुका अध्यक्ष बानुबाई दुशिंग आदींच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले.
या प्रसंगी मोतीराम पिंगळे, गौतमराव सोनवणे, सुनील पांडव, अशोक दिवेकर, वस्तीगृहाचे अधीक्षक देविदास महाले, सोनवणे व विद्यार्थी उपस्थित होते.