स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..

स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाची कार्यकारिणी जाहीर..

News15 मराठी प्रतिनिधी अस्लम शेख 

लातूर : अहमदपूर शहरातील स्वराज्य मित्र मंडळ संचलित स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ २०२४ यांची स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच सर्व मित्र परिवारातील जेष्ठ सदस्याच्या उपस्थित गणेश मंडळाची बैठक प्रसाद गार्डन अहमदपूर येते आज दि.२०ऑगस्ट रोजी पार पडली. सर्व प्रथम श्री गणरायाचे वंदन करून नंतर मंडळाची बैठक सुरू झाली.

मागील वर्षी मंडळाला तालुक्यातील प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन करण्यात आले आता हे मंडळाचे यशस्वी १६ वे वर्ष आसून त्यामधील बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे जी अतिशय भव्य दिव्य अशी मिरवणूक व तसेच सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सर्वांनी मानस केला. तसेच यावर्षीच्या उत्सवात एक सदस्य एक वृक्ष, रक्तदान शिबिर, व समाजउपयोगी विशेष कार्यक्रम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले. व नंतर एक मताने मारोती अण्णा हेमनर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व पुढील कार्यकारणीची सन २०२४ गणेशोत्सवासाठी पुढील प्रमाणे कार्यकारणी नियुक्त करण्यात आली.अध्यक्ष: मारोती अण्णा हेमनर,तर उपाध्यक्ष: शिवराज चोतवे.देवा उराडे,सचिव: महेश जाधव,सहसचिव: गणेश तोडकर,कार्याध्यक्ष: बालाजी कानवटे,कोषाध्यक्ष: राहुल भालेराव ,ऋषी पामुलावर, व समस्त स्वराज्य मित्र मंडळ या बैठकीत उपस्थित होते व नंतर नूतन कार्यकारणीचा सत्कार करण्यात आला.