गुरुपौर्णिमेनिमित्त न्याहरिमाता डोंगर येथे वृक्ष लागवड...

गुरुपौर्णिमेनिमित्त न्याहरिमाता डोंगर येथे वृक्ष लागवड...

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी : निसर्ग हाच गुरु तेथूनच आपले अस्तित्व सुरू या विचारांनी प्रेरित या वर्षातील दुसऱ्या फेरीतील वृक्षारोपण करण्यात आले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही डोंगरावर वृक्षलागवड करून स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने गुरु पौणिमा साजरी करण्यात आली.सर्वप्रथम रोपांसाठी खड्डे खोदण्यात आले.त्यासाठी दिंडोरीतील बांधकाम व्यावायिक इंजिनियर वैभव वडजे यांनी १५००० रुपये किमतीचे पेट्रोल ड्रील मशीन उपलब्ध करून दिले.तसेच हॉटेल व्यावसहिक तुषार बोरस्ते यांनी १२१ रोपे,डॉ.स्वप्नील जाधव यांनी ७० रोपे,सुनील घडवाजे यांनी ६० रोपे,अनिल गाडे,भाऊसाहेब चव्हाणके,संदीप कांदे,राजेंद्र कट्यारे यांनी अनेक प्रकारच्या भारतीय प्रजातीचे रोपे उपलब्ध करून दिले.

वणव्यात झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत म्हणून जाळरेशा घेण्यासाठी गणेश कदम यांनी तणनाशक उपलब्ध करून दिले,वाहतुकीचासाठी गाडी मालक नंदू कदम,शंकर गवळी,भास्कर चव्हाणके यांनी सहकार्य केले. दुसऱ्या फेरीत साधारणतः तीनशे पेक्षा जास्त रोपांचे रोपण करण्यात आले,यामध्ये करंज शिशु खैर,बहावा,फणस,शिवण,हत्तिफळ,कडूनिंब,या वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली.तसेच लहान मुले व महिला यांनी वृक्षारोपण बरोबरच अनेक प्रकारच्या झाडांचे बीज व बिजगोल्यांचे रोपण करण्यात आले.

या वृक्षारोपणात वैष्णवी चव्हाणके,वैशाली जाधव,सुरेखा कांदे,ज्योती भामरे,सोनल होळकर,रेणू गिरासे,शालिनी जाधव,क्रांती चव्हाणके,अनन्या ठाकूर,श्रीमई सोमवंशी,बाळनाथ जाधव,सचिन भामरे,रामदास बुरकुल,संदीप कांदे,अनिल गाडे, रोषण संधान,प्रवीण घोलप,पंकज ठाकरे,प्रवीण भेरे,दिलीप सोनवणे अमोल सोमवंशी,राजेंद्र कट्यारे,प्रवीण सोमवंशी,समाधान जाधव,शांतीगिरी वांजुल,सदाशिव उगले,आर्यन बुरकुल,रुद्राक्ष चव्हाणके,विठ्ठल भालेकर,गौरांग पवार यांच्यासह नाशिक शहर,अक्राळे कोराटे, वणारवाडी,दिंडोरीतील निसर्ग प्रेमींनी सहभाग नोदवला.