पालखेड बंधारा जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण...
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जि.प.प्राथमीक शाळेचे शिक्षक अमोल पवार यांच्या वाढदिवसा निमित्ताने; शाळेच्या प्रांगणात विविध जातीच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब थोरात यांनी; अमोल पवार यांचे कौतुक करून, शाळेतील विविध उपक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर राहत असून नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांसाठी राबवत असतात व शाळेचे नावलौकिक कसे होईल यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी उपसरपंच बबलू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पीठे तसेच शाळेच्या शिक्षकांनी अमोल पवार यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी बापू चव्हाण यांनी सांगितले की, पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळेमध्ये विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली. या उपक्रमाच्या माध्यमातून पवार यांनी केवळ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला याप्रसंगी शिक्षकवृंद उपस्थित होते.